Pune : मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दुसर्‍या आरोपीला लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. नुकतीच या गुन्ह्यातील शुभम कामठे याला पकडले होते. त्यावेळी तो फरार झाला होता.

शुभम भाऊसो बरकडे (वय 23, रा. लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात या दोघांसह टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. मात्र दोघे पसार होते. टोळीने एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला गाठत त्याच्यावर वार केले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादरम्यान या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान लोणी काळभोर पोलीस या दोघांचा शोध घेत होते. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी शुभम कामठे याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडले होते. पण, शुभम बरकडे हा पसार झाला होता. त्याचा शोध घेत होते. यावेळी कर्मचारी अमित साळुंखे यांना शुभम हा कोलपेवस्तीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली आहे.

ही कारवाई परिमंडळ चारच्या उपायुक्त नम्रता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, कर्मचारी नितीन गायकवाड, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, दिंगबर साळुंखे, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांच्या पथकाने केली आहे.