‘बनावट’ आधार कार्ड बनविणारा गजाआड, लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासकीय यंञणांकडे व विविध केंद्रामध्ये आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडे आधारकार्डसाठी आवश्यक कागदपञांची पुर्तता केल्याशिवाय आधारकार्ड मिळत नाही. परंतु थोड्या पैशासाठी बनावट आधारकार्ड काढुन देणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढत असून अशीच बनावट आधारकार्ड काढुन देणाऱ्या कदमवाक वस्ती गावच्या हद्दीत एम आयटी काॅर्नर जवळ अनुजा होस्टेल ०२ सफारी वर्ल्ड सायबर कॅफे मध्ये रणजित बबन खेडेकर (वय-३५ वर्ष, रा. उरूळी कांचन, खेडेकर मळा) हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट आधारकार्ड बनवुन देण्याचे काम करीत होता यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पोलिस नाईक संदीप पवार यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रत्येक शासकीय कामकाजात आधार कार्ड महत्वाचा पुरावा समजला जातो. परंतु अलिकडे बनावट आधारकार्डचे पेव फुटलेले आहेत. लोणी कोळभोर येथील कारवाईत एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका आधारकार्ड साठी ५०० रूपये घेऊन बनावट आधारकार्ड बनविले जात होते. यापूर्वी याच व्यक्तीवर बनावट शासकीय कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी लोणी काळभोर ठाण्यात गुन्हाची नोंद आहे.

लोणी काळभोर पोलीसांना याची माहीती मिळाल्यानंतर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईत आधारकार्ड बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ईन्टेक्स कंपनीचे दोन सीपीयु व हार्डडिस्क, एक माॅनिटर, कलर प्रिंटर्स, शाळा सोडल्याचे दाखले, मार्कशिट, आधारकार्ड, लाईटबिल व १४२० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.