Pune : लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा आजपासूनच पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर पुण्याच्या नवीन आयुक्तालयाची पुनर्रचना करण्यात आली होती. आता गृहविभागाने आज पुणे पोलीस आयुक्तालयाची फेररचना करत ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस ठाणे आज पासून पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आल्याचे आदेश गृहविभागाने काढले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहर येत होते. पण पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढला आणि दोन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले. यानंतर पुणे शहर पोलीस दलाची रचना बदली होती. काही पोलीस ठाणे कमी झाले होते. पण हद्द विस्तार देखील वाढला होता. यानंतर ग्रामीण पोलीस दलातील हवेली, लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. शासनाला तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने आज लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलिस ठाणे पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट केल्याचे आदेश पारित करत नवीन आयुक्तालयाची पुनर्रचना केली आहे.

परिमंडळ पाचला मजुरी

शहरात पूर्वी चारच झोन होते. पण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर झोन 4 पिंपरीत गेला. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी शहरात पाच झोन सुरू केले आणि त्या झोनच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. पण त्याला शासन दरबारी अद्याप तरी मंजुरी नव्हती. आत बदलेल्या आयुक्तालयाच्या पुनर्रचनेत त्या पाचव्या झोनल देखील मंजुरी दिली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले आहे.

You might also like