पुणे महापालिकेच्या सुनील शर्माच्या घरात ‘घबाड’ ! ACB च्या पोलिसांची रात्र नोटा मोजण्यात गेली 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून 500 ची लाच घेणाऱ्या त्या मुकादमाच्या घरी एसीबीने टाकलेल्या छाप्यात घबाड सापडले असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पूर्ण रात्र पथक नोटा मोजत बसले होते. सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55) असे घरात घबाड सापडलेल्या मुकादमाचे नाव आहे.

शनिवारी मुकादमाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली होती. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम शर्मा आणि खासगी व्यक्ती गोपी उबाळे (32) यांना पकडण्यात आले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील शर्मा हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम म्हणून नोकरीस आहेत. तर उबाळे हा खासगी व्यक्ती असून तो बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. यानंतर एसीबीने शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने मिळाले. यावेळी पथकाला रात्र जागून काढावी लागली.

याठिकाणी 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले आहेत. दागिने आणि रोकड जप्तकरून ते येरवडा पोलीस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलीसही आवक झाले आहेत.

येरवडा पोलीस म्हणतात जमा नाही…

एसीबीने कारवाई करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शर्मा आणि उबाळे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनतर छापा टाकून सापडली 36 लाखांची रोकड आणि सोने पंचा समक्ष येरवडा पोलीस ठाण्यात जमा केली आहे. मात्र, येरवडा पोलीस अजून आमच्याकडे काही जमा केले नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे येरवडा पोलीस माहिती लपून नेमका कोणाला वाचवत आहेत, हे समजत नाही. त्यामुळे आधीच वादाच्या भोहऱ्यात सापडलेल्या येरवडा पोलिस आणखी संशयाच्या खोलात जात आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like