55 वर्षांनंतर कुटुंबात जन्मलेल्या चिमुकलीचं केलं जल्‍लोषात स्वागत

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या थिगळे कुटुंबात तब्बल 55 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. 55 वर्षानंतर जन्माला आलेल्या चिमुकलीचे जंगी स्वागत करण्यात आले. कुटुंबीयांनी गावकरी, पाहुणे आणि उपस्थितांना पेढे, साखरेचं वाटप करत तसेच आई आणि बाळाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. थिगळे कुटुंबीयांनी घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं थाटामाटात स्वागत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.


थिगळे कुटुंबामध्ये तब्बल 55 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. गेले अनेक वर्ष थिगळे कुटुंबीय चिमुकलीच्या प्रतीक्षेत होते. समीर आणि नीलिमा थिगळे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. या कन्यारत्नाचे घरातल्या सदस्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केलं. या छोट्या परीला आणि आईला रविवारी (8 सप्टेंबर) वाजतगाजत घरी आणण्यात आलं. घरचा उंबरठा ओलांडताना आई आणि लेकीचं स्वागत फुलांच्या पायघड्यांनी-रांगोळ्यांनी केलं गेलं.

आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलींच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. खेड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चार मुली बेवारस अवस्थेत सोडल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठवण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –