Pune : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर जयंती घरात साजरी करून पुस्तक मिळवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करून त्यांचे पुस्तक मिळवा, असे आवाहन हडपसर इंदुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश वाडकर आणि अर्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र वाडकर यांनी केले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. मात्र, देशभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता घरामध्ये त्यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावून कुटुंबासमवेत जयंती साजरी करावी. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजामध्ये चांगला संदेश देण्याचे काम करावे, असे आवाहन इंदुबाई वाडकर स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश वाडकर आणि अर्जुन बनकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बनकर यांनी केले आहे.

उद्या (रविवार, दि. ११ एप्रिल) सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले जयंती घरामध्ये साजरी करून कुटुंबासमवेतचे छायाचित्र 9552527263 या व्हाट्सअॅपवर पाठवावे. त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले यांचे पुस्तक भेट देण्यात येणार आहे. तसेच, याच पद्धतीने १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून कुटुंबीयांसमवेतचा फोटो पाठवाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक भेट देण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने वाडकर आणि बनकर यांनी कळविले आहे.