Pune MahaVitaran News | खोदकामामुळे वारजे परिसरातील वीजवाहिन्यांचे नुकसान; महावितरणसह वीजग्राहकांना फटका

0
202
Pune MahaVitaran News | Damage to power lines in Warje area due to digging; Electricity consumers hit with MahaVitaran
file photo

पुणे : Pune MahaVitaran News | सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या वारंवार तोडल्या जात असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वारजे परिसरातील (Warje Area) विविध भागात खंडित वीजपुरवठ्याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. (Pune MahaVitaran News)

दरम्यान महावितरणने यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाला लेखी पत्र दिल्यानंतर वारजे येथील खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणाची नुकतीच संयुक्त पाहणी झाली. यापुढे खोदकामात वीजवाहिन्यांची कोणतीही क्षती होणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरविण्यात आले तसेच वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च महावितरणला देण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला पालिकेकडून देण्यात आला आहे. (Pune MahaVitaran News)

याबाबत माहिती अशी की, सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे वारजे परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदकाम सुरु केले. यामध्ये गेल्या १ ते ८ मार्च दरम्यान वारजे ब्रीज, खानवस्ती, वारजे वाहतूक पोलीस चौकी, रामनगर तसेच वारजे पाणीपुरवठा याठिकाणी २२ केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या होत्या. परिणामी पुणे मेट्रो, डहाणूकर कॉलनी, प्रथमेश सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, डुक्करखिंड परिसर, खानवस्ती, हिंदुस्थान बेकरी, रामनगर आदी परिसरातील काही भागात ३ ते ४ हजार वीजग्राहकांना सरासरी १ ते २ तासांपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला तर उर्वरित ठिकाणी महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

खोदकामात जेसीबीने भूमिगत वीजवाहिन्या तोडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यास कंत्राटदाराने नकार
दिल्यानंतर महावितरणकडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ लेखी स्वरुपात कळविण्यात आले.
तसेच वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
यानंतर महावितरण व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोदकामाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली.
यापुढे खोदकामात भूमिगत वीजवाहिन्यांना कोणतीही क्षती होणार नाही याबाबत उपाययोजना व
समन्वयाबाबत यावेळी ठरविण्यात आले. तसेच महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च
देण्याचा आदेश संबंधित ठेकेदारास महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

Web Title :- Pune MahaVitaran News | Damage to power lines in Warje area due to digging; Electricity consumers hit with MahaVitaran

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा