Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाच्या धडकेने वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाने ३३ केव्ही डबलसर्कीट वीजवाहिन्यांच्या खांबाला रविवारी (दि.१९) पहाटे एक वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये वीजखांबासह वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यानंतर महावितरणकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करून आज दुपारी १२.४१ वाजता सर्वच ३० उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. (Pune Mahavitaran News)
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण (Chakan) १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून ह्युंदाई-कॉर्निंग ३३ केव्ही डबल सर्किट वीजवाहिनीद्वारे चाकण एमआयडीसी फेज दोनमधील उद्योगांना वीजपुरवठा केला जातो. मात्र या वीजवाहिनीच्या खांबाला आंबेठाण रस्त्यावर अज्ञात वाहनाने आज पहाटे एकच्या सुमारास धडक दिली. नंतर चालक वाहनासह पळून गेला. मात्र या धडकेत वीजखांब व डबल सर्कीटच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्याने चाकणमधील ३० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला. (Pune Mahavitaran News)
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे (Deputy Executive Engineer Vijay Gargote),
शाखा अभियंता रामप्रसाद नरवडे (Branch Engineer Ramprasad Narwade),
जनमित्र योगेश जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन इतर वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठ्याची तयारी सुरु केली.
तांत्रिक उपाययोजना झाल्यानंतर सर्वच ३० उद्योगांचा वीजपुरवठा दुपारी १२.४१ वाजता पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. तसेच जमीनदोस्त झालेल्या वीजखांबाची उभारणी, वीजवाहिन्यांची जोडणी तसेच डिस्क इन्सूलेटर बदलण्यासह इतर कामे सुरु करण्यात आले असून सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान वीजखांबाला धडक देऊन नुकसान करणाऱ्या भरधाव वाहनचालकाविरुद्ध महावितरणकडून फौजदारी फिर्याद दाखल करण्यात येत आहे.
Web Title :- Pune Mahavitaran News | Electric pole toppled by speeding vehicle; Electricity supply started in Chakan through alternative system
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले