Pune Mahavitaran News | ‘पॉवर ग्रीड’च्या वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण; पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत

पुणे : Pune Mahavitaran News | पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या Power Grid Corporation of India Limited (पीजीसीआयएल – PGCIL) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह (Chakan MIDC) पुणे (Pune City) व पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad CIty) सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १९) पहाटे १ वाजेपासून सकाळी ८.५५ वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. (Pune Mahavitaran News)

दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडल्याने तसेच भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी (दि. १८) रात्री १० वाजेपासून पहाटे ३ वाजेपर्यंत कोथरूड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण आदी भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागले.

याबाबत माहिती अशी की, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाला. पाहणीमध्ये तळेगाव नजिकच्या करंजविहिरे गावाजवळ अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्रीच अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. (Pune Mahavitaran News)

परंतु, या बिघाडामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण,
१३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
तब्बल ३९६ मेगावॅट विजेचे वहन बंद पडले होते. परिणामी पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर,
येरवडा, धानोरी तसेच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर,
संपूर्ण प्राधीकरण आणइ आकुर्डीमधील ५० टक्के भाग असा एकूण ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
झाला होता. सोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा
वीजपुरवठा बंद पडला.

महापारेषण व महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांशी संपर्कात होते.
एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी व तांत्रिक बिघाडामुळे ३९६ मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या
प्रतिकूल परिस्थितीत भारव्यवस्थापनाद्वारे वीजग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु होते.
यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला.
महापारेषण व महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरु होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत
होत गेला. आज सकाळी ८.५५ पर्यंत पॉवर ग्रीडच्या वीजवाहिन्यांमुळे खंडित झालेल्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा
पूर्ववत करण्यात आला आहे.

Advt.

Web Title :  Pune Mahavitaran News | Repair of ‘Power Grid’ channels completed; Restoration of power supply to Chakan MIDC along with Pune, Pimpri city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Pune PMC News | पुण्याच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – भांडणे सोडविणार्‍या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न