बर्गर किंगमध्ये पार्टी करणे रिक्षाचालकाला पडले महागात, थेट आयसीयूत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खुप दिवसांनी भेटलेल्या मित्रांनी बर्गर किंगमध्ये दिलेली पार्टी एका रिक्षाचालकाला महागात पडली आहे. बर्गर खाल्ल्यानंतर लागलीच त्याला ठसका लागला आणि त्य़ाच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर बर्गर पाहिला तेव्हा त्यात काचेचे तुकडे होते. त्यानंतर त्याला थेट रुग्णालयात दाखळ करण्यात आले.

याप्रकरणी बर्गर किंगविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रिक्षाचालक म्हणून काम करणारा साजित पठाण हा गेल्या काही दिवसांपासून मित्रांना भेटला नव्हता. मित्रांची भेट झाली नाही म्हणून त्यांनी बर्गर किंगच्या एफसी रोडवरील आऊटलेटमध्ये भेटण्याचे ठरविले. त्यानंतर ते तेथे भटले. साजितने त्याच्यासाठी आणि मित्रांसाठी बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स आणली होती.

त्यानंतर सर्व मित्र गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता त्यांनी बर्गर खाण्यास सुरुवात केली. तेव्हा साजितला अचानक ठसका लागला. त्यानंतर त्याच्या तोंडावाटे रक्त येऊ लागले. त्यामुळे मित्र घाबरले. त्यांनी त्याला थेट रुग्णालयात नेले. याप्रकऱणी तरुणांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळून आले. त्यानंतर बर्गरकिंगमधील त्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेत पोलिसांनी मागविले आहे.

You might also like