पीएमपीच्या धडकेत सायकलवरील जेष्ठाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव पीएमपीएलने दिलेल्या धडकेत एका सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जागिच मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी चालकाला पकडले आहे.

दिलीप इंदूशेठ काची (वय 57, रा. संगमवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक नवनाथ कोलते (वय 31,रा. पिसर्वे, पुरंदर) याला अटक केली आहे. अंकुश काची (वय 33) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप संगमवाडी परिसरात राहायला होते. ते गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बोलाई चौक सिग्नलवरुन नरपतगिरी रस्त्याकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएलने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने दिलीप गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे अधिक तपास करीत आहेत.

You might also like