पुण्यात एलियन दिसला अन् पोलिसांची उडाली झोप

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यामध्ये एलियन दिसल्याने पुणे पोलिसांची झोप उडाली. मात्र, याचा तपास केल्यानंतर ज्याने एलियन पाहिला तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु पुण्यात एलियन दिसल्याचा दावा केल्याने एकच खलबळ उडाली.

पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने एलियन दिसल्याचा दावा केला. त्याने याची माहिती पंतप्रधान कार्य़ालयाला मेल करुन दिली. पंतप्रधान कार्य़ालयाने तो मेल महाराष्ट्र सरकारला पाठवला आणि पुणे पोलिसांची झोप उडाली. पुणे पोलिसांनी त्या व्यक्तिचा शोध घेतला असता तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समोर आले.

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पुण्यातील कोथरुडमध्ये वास्तव्याला असलेल्या एका व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला एक इमेल पाठवला. त्याला स्वतःच्या घराच्या बाहेर एलियन दिसल्याचा दावा त्यानं इमेलमध्ये केला आहे. पंतप्रधान कार्यालयानं हा इमेल महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी पुणे पोलिसांकडे सोपवली आहे.

पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असून, इमेल पाठवणारा ४७ वर्षीय व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं तपासात आढळलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी त्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला होता, त्यानंतर त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यानं घराबाहेर वीज पाहिली आणि त्याला ते एलियश असल्याचा भास झाला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं थेट पीएमओला मेल केला होता आणि त्याची कल्पना घरच्यांनाही दिली नाही.

Loading...
You might also like