Pune Manchar Love Jihad Case | मंचर मधील लव्ह जिहाद घटना : महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा परखड सवाल

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Manchar Love Jihad Case | मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खा. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का?, असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते (Chief Spokesperson, BJP Maharashtra) केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले (Varsha Bhosale BJP), मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित मिश्र (Amarjeet Mishra) आदी उपस्थित होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेचा निषेध करण्याची भूमिका घेण्याचे धाडस राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता तरी दाखवावे, असेही उपाध्ये यांनी सांगितले. (Pune Manchar Love Jihad Case)

उपाध्ये म्हणाले की ,पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनेला आठवडाभरापूर्वी भाजपा आ. गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी वाचा फोडली. ‘लव्ह जिहाद’ ची घटना उघड होऊन सात आठ दिवस लोटले तरी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायद्याला विरोध करणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्याच तालुक्यातील तरुणीसोबत हा प्रकार घडून सुद्धा ब्र देखील काढला नाही.राज्यात ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही घडत नाही,असं ठासून सांगणाऱ्या खा. सुप्रियाताई सुळे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. हाथरस तसेच इतर महिला अत्याचाराच्या घटनांबाबत तातडीने व्यक्त होणा-या सुप्रियाताईंनी या घटनेबाबत मात्र मौन पाळले आहे. (Pune Manchar Love Jihad Case)

आता तरी त्यांनी मौन सोडून ठाम भूमिका मांडावी असे उपाध्ये म्हणाले. मंचर च्या घटनेत अल्पवयीन मुलीला
फूस लावून पळवण्यात आले. तिचे लैंगिक शोषण करण्यात आले ,बळजबरीने गोमांस खायला लावले गेले,
बुरखा घालण्याची सक्ती केली गेली. हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे ? हिंदू समाज एकवटून लव्ह जिहाद विरोधी
मोर्चे काढत असताना याच सुप्रियाताईंनी मोर्चाची खिल्ली उडवली होती याचे स्मरण उपाध्ये यांनी करून दिले.

राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी पीडित मुलीची व
तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे सौजन्यही दाखविले नाही. मंचर सारख्या लव्ह जिहाद च्या घटनांकडे राजकीय
फायद्या तोट्याची गणिते बाजूला ठेवून पहायला हवे. असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

Advt.

Web Title :   Pune Manchar Love Jihad Case | Does NCP Stand on Women Atrocities Determined by Religion? BJP State Chief Spokesperson Keshav Upadhyay asked the question To MP Supriya Sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; छोट्या पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Raigad Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज, सोहळा अर्ध्यात सोडून माघारी

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक