नांगरे पाटील चाकणमध्ये दाखल, शांत राहण्याचे आवाहन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी चाकण परिसरात पुकारलेल्या बंदला दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने 100 हुन अधिक गाड्यांची तोडफोड केली. वाहनांची जाळपोळ केली. या संतप्त जमावात कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आले आणि आंदोलकांशी संवाद साधत शांत राहण्याचं आवाहन केलं.

पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.
[amazon_link asins=’B078TLB8TG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04fa0743-93f7-11e8-a75f-bb253040b6d8′]

जमवाच्या दगडफेकीत खेड डीवायएसपी राम पठारे, देहूरोड डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांच्यासह चार कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी मागवलेल्या 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली आहे. जमावाने 100 हुन अधिक वाहनाचे तोडफोड केली तर 8 ते 10 वाहने पेटवली. सध्या चाकणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. तणाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर नळकांड्याचा वापर करण्यात आला आहे. डीवायएसपी राम पठारे, देहूरोड डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांच्यासह चार कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी मागवलेल्या 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली आहे. जमावाने 100 हुन अधिक वाहनाचे तोडफोड केली तर 8 ते 10 वाहने पेटवली. सध्या चाकणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. तणाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर नळकांड्याचा वापर करण्यात आला आहे.

पुणे : मराठा आंदोलन : चाकणमध्ये जमावबंदी लागू