Pune : 7 लाख रूपयांसाठी विवाहीतेचा छळ, सोलापूरमधील सासरच्या मंडळींविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नात मानपान केला नाही, घर घेण्यासाठी ७ लाख रुपये दे अन्यथा आम्ही नांदविणार नसल्याची धमकी देत विवाहितेचा छळकरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी स्वप्नील शशीकांत साळुंके, शशिकांत शिवाजी साळुंके आणि आशा शशिकांत साळुंके (सर्व रा. इंदिरानगर, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रिया स्वप्निल साळुंके (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि स्वप्निलचे जुलै २०१९ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पती स्वप्निल, सासू आशा आणि सासरे शशिकांत यांनी प्रियाचा छळ करण्यास सुरुवात केली. प्रियाच्या कुटूंबियांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, फर्निचर दिले नाही, पुण्यात घर घेण्यासाठी ७ लाख रुपये न दिल्याच्या रागातून सासरच्यांनी प्रियाला नांदविणार नसल्याची धमकी दिली. वेळोवेळी प्रियाशी भांडण करुन हाताने मारहाण केली. तिचा शारिरीक व मानिसक त्रास दिला. अधिक तपास कोथरुड पोलिस करीत आहेत.