Coronavirus Lockdown : ‘या’ तारखेपासून पुण्यातील मार्केटयार्डातील गुळ भूसार विभाग बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि गुळ भूसार विभागातील काही व्यापारी कोरोनाबाधित झाल्यामुळं मंगळवार (दि.19) पासून मार्केट यार्डमधील गुळ भुसार विभागतील घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली आहे.

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासन पावले उचलत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दि पूना मर्चंटस् चेंबरने मार्केटयार्डातील गुळ भूसार विभागातील घाऊक व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.