पुण्यातील संचारबंदी : मार्केटयार्डामध्ये प्रचंड गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह शहरात संचारबंदी करण्यात आली असताना मार्केटयार्ड परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळाले. भाजी खरेदीसाठी नागरिक जमा झाले होते. दरम्यान येथे गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाल्याची अफवा पसरली होती.

देशभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून संचारबंदी जाहीर केली आहे. तर पुणे पोलिसांनी नागरिक बाहेर पडत असल्याने सोमवारी सायंकाळपासून वाहने रस्त्यावर अण्यास मनाई केली आहे. दरम्यान मार्केटयार्डमध्ये राज्यातून शेतकरी माल घेऊन येतात. दररोज सकाकी येथे शेतकरी, विक्रेते आणि किरकोळ विक्रेते व ग्राहक यांची मोठी गर्दी असते.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड असोसिएशनने उद्यापासून (दि. 25 ते 31 मार्च) मार्केटयार्ड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा (दि. 24, मंगळवार) दिवस केवळ येथील व्यवहार सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

साधारण सव्वा आठ वाजता नागरिकांना आत सोडण्याचे बंद करण्यात आले. तसेच घाऊक भाजी विक्री देखील बंद करण्यात आली. यावेळी काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजाऊंन सांगितले. त्यांनतर येथील गर्दी कमी झाली.