पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दत्तवाडी परिसरात घडली. पतीचे दुसर्‍या महिलेसोबत प्रेम संबंध होते.

आरती अविनाश भोसले (वय 25, रा. दांडेकर पुल) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अविनाश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती यांचे वडिल दादाराव शिंदे यांनी दत्तावाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती व अविनाश यांचा 2010 साली विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. दरम्यान, लग्नानंतर 5 वर्ष आनंदाने संसार सुरू होता. मात्र, त्यानंतर पती सतत वेगवेगळ्या कारणांवरून आरती यांना त्रास देत होता. तर, त्याचे बाहेरही एका महिलेसोबत प्रेम संबंध सुरू होते. यावरूनही तो त्रास देत असे. सततच्या त्रासाला कंटाळून तीन दिवसांपुर्वी आरती यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like