सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कोथरूड भागात ही घटना घडली आहे. पैशांची मागणी करत तिचा छळ करत असल्याचे सांगण्यात आले.

आशा किसन चव्हाण (वय २७, रा. शास्त्रीनगर, कोथरुड ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती किसन चव्हाण याच्यासह सासूसासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाऊ गोविंंद राठोड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि किसन यांचे पाच वर्षांपुर्वी लग्न झाले होते. दोघेही कोथरुड परिसरात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवित होते. लग्नानंतर पती किसन आणि सासू-सासरे आशाला सातत्याने माहेरुन पैसे आणण्याची मागणी करीत होते.

तिला टोचून बोलून शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यामुळे छळास कंटाळून आशाने तीन दिवसांपुर्वी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे अधिक तपास करीत आहेत.