Pune : 26 वर्षीय विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या, मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला सतत टोचून बोलत तिला “तू एकदाची मरत का नाही” असे म्हंटल्यानंतर पत्नीने या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दीपाली सागर कांबळे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर मोहन कांबळे (वय 25) याच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दीपाली यांची बहिण रूपाली कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली कांबळे पती सागर याच्यासोबत मार्केटयार्डमधील प्रेमनगर वसाहतीत राहत होता. त्यांचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. सागर हा मार्केटयार्ड येथे नारळ विक्रीचा व्यवसाय करत असे.

दरम्यान लग्नानंतर सागर हा दीपाली यांना किरकोळ कारणावरून वारंवार त्रास देत होता. जेवण नीट बनवत नाही, आई कडे लक्ष देत नाही, माहेरी नातेवाईकाशी फोनवर बोलत असते, असे म्हणून तो शारीरिक आणि मानसिक छळ करत. तर अधूनमधून मारहाण देखील करत असे. यादरम्यान तो दीपाली यांना तू एकदाची मरत का नाहीस, म्हणजे मला तुझ्यापासून सुटका मिळेल असे बोलला होता. यानंतर दिपाली यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.