पुर्वी मुल होत नसल्यानं अन् 11 वर्षानंतर मुलगी झाली म्हणून छळ, विवाहीतेनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाला 11 वर्ष झाली. पण, मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीने छळ सुरू केला. नशिबानं 11 वर्षांनी मुलगी झाली. मात्र, तरीही मुलगा कसा झाला नाही, म्हणून तिचा छळ सुरूच राहिला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नयना सतिश लोंढे (वय 27, रा. वडगावशेरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सतिश लोंढे आणि 70 वर्षीय सासरे यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नयना मुलगी असून, 2006 मध्ये आरोपी सतिश लोंढे याच्यासोबत विवाह झाला होता. आरोपी सतिश लोंढे हा काही करत नाही. त्याला भाड्याने दिलेल्या खोल्यांचे भाडे येते. त्यावरच त्यांचे घर चालते. दरम्यान, लग्नाला अकरा वर्ष होत आली तरी त्यांना मुल-बाळ होत नव्हते. यामुळे लग्नानंतर काही वर्षांनी आरोपी व त्याचे सासरे हे मुल होत नसल्याने त्रास देत होते. मात्र, तरीही नयना या त्रास सहन करून राहत असत.

दरम्यान, 11 वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. मात्र, आरोपींनी मुलगीच झाली. मुलगा का नाही, असे म्हणून पुन्हा नयना यांचा छळ सुरू केला. शेवटी या छळाला कंटाळून नयनाने काही दिवसांपुर्वी किचनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादींच्या वडिलांनी अंत्यसंस्कार झाल्यानंतर आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराला बेदम मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लुटमार करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, पुणे-सोलापूर रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला लाकडी बांबूने बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी आकाश सुरवसे (वय 40, रा. कदमवाक वस्ती, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्यावरून पुणे-सोलापूर रस्त्याने मांजरी बुद्रुक परिसरात जात होते. यावेळी द्राक्ष संशोधनाजवळ आल्यानंतर पाठिमागून दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी फिर्यादींना अडवले. तसेच, लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोकड आणि मोबाईल असा 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहायक निरीक्षक एच. बी. खोपडे यांनी फिर्याद दिली आहे.

धनकवडीत शस्त्रधारी टोळक्याचा धुडगूस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धनकवडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत तरुणांवर धारधार हत्याराने वार करून तुफान राडा घातल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी आदेश बिरमाणे (वय 24, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदेश बिरमाणे व त्याचा मित्र संदिप शेंडकर हे दोघे रंजनी कॉर्नरवर मोबाईलवर गेम खेळत बसले होते. यावेळी दुचाकीवर काही तरूण त्याठिकाणी आले. काही एक कारण नसताना त्यांनी अचानक फिर्यादीच्या हातावर तसेच मानेवर लोखंडी शस्त्राने व लाकडाने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तर, फिर्यादीचा मित्र संदिप यालाही बेदम मारहाण करून परिसरात दहशत माजविली. काही काळ सुरू असणार्‍या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर टोळके दुचाकीवरून तेथून पसार झाले. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –