पुणे : लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा मौलाना अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

कोंढवा येथील मदरसामध्ये ३० पेक्षा जास्त मुलांचा लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मदरसाच्या मौलाना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदरासामधील दोन मुलांना सीडब्ल्यूसीसमोर उपस्थित करण्यात आले. त्यांचेवर समोपदेशन करण्यात आले त्यावेळी त्यांनी हा धक्कादायक प्रकार सांगितला. तसेच मदरसामधील इतर मुलांचेही लैंगिक शोषण करण्यात आले असल्याची माहीती समोर आली.

[amazon_link asins=’B00004YRPE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f260060f-91b4-11e8-9838-bf28aa8e4020′]

सीडब्ल्यूसीच्या सदस्यांना ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर घटनचे गांभीर्य़ ओळखून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मदरसाच्या मौलानाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून मदरसामधील मुलांचे रेस्क्यू करण्याचे काम सुरु केले आहे. दोन लहान मुलांमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
समोपदेशना दरम्यान लहान मुलांनी सीडब्ल्यूसीच्या सदस्यांना दिलेल्या माहितीनुसार, मदरसामध्ये मौलवीकडून लैंगिक शोषण करण्यात येत होते. त्यामुळे ही दोन मुले मदरसामधून पळून गेली होती. पळून गेल्यानंतर पुणे स्टेशन परिसरात काम करुन आपली उपजीवीका भागवत होते.