पुण्याच्या महापौर पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. पुण्यासह राज्यातील 10 महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला. पुणे महापालिकेचे महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांची नावे चर्चेत येत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या महौपर पदी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणत्या गटातील नगरसेवक महापौर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पुणे महापालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहेत. महापौर मुक्ता टिळक यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आणि पक्षाने त्यांच्यावर वेगळी जबाबदारी दिल्याने महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

पुणे महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या नजरा महापौर खुर्चीकडे वळल्या आहेत. मोहोळ आणि भिमाले यांच्यासह नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे,  हेमंत रासणे, श्रीकांत जगताप, दिलीप वेडे पाटील, सुशील मेंगडे, दिपक पोटे यांची नावे देखील चर्चेत आहेत. दरम्यान, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आरपीआयला पाच वर्षासाठी उपमहापौर पद हवे असल्याचे सांगितले.

राज्यात विरोधी पक्षाचे शासन यायची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मुरली मोहोळ यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. पुढील सव्वा दोन वर्षात दोन जणांना संधी देणार अशी चर्चा आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like