Pune : प्रेम विवाहानंतर महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम विवाहानंतर देखील महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. कोंढव्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पती अक्षय कांबळे व त्याच्यइतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व अक्षय यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी 2018 मध्ये प्रेम विवाह देखील केला. मात्र, विवाहानंतर काही दिवसात सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तरुणीचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या कारणासाठी पीडित महिलेचा ते छळ करत होते. त्यांनी 2018 ते डिसेंबर 2020 या कालावधीत हा छळाचा सुरू होता. या छळाच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी माहेरी निघून आल्या. दरम्यान, त्यांनी आता फिर्याद दिली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.