Pune Metro | मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Metro | बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो (Pune Metro) कार शेडवर जाऊन लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्या. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.

मेट्रोच्या सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडच्या (Kothrud) जुन्या कचरा डेपोवर मेट्रोचे कार शेड आहे. याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूस प्रशिक्षण सुरू होते. मेट्रो शेडमध्ये काम करीत असताना पत्र्यावर अचानक गोळ्यांचा आवाज झाला. यातील काही गोळ्या पात्रता छेदून आतमध्ये आल्या. यातील एक गोळी कर्मचाऱ्याला लागली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, ही गोळी एके 47 किंवा तत्सम रायफलची असावी असा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे.
तसेच मेट्रोचे अधिकारीही याविषयावर बोलणे टाळत आहेत.
ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.

 

दरम्यान, कोथरूड कचरा डेपो मेट्रो कार शेडच्या परिसरात लष्करी प्रशिक्षणादरम्यान गोळीबार झाल्याच्या बातमीत तथ्य नाही. या संपूर्ण परिसरात कोणतेही लष्करी युनिट किंवा फायरिंग रेंज नाही. तसेच कोणतेही प्रशिक्षण सुरू नव्हते. त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाही. लष्करी प्रशिक्षणादरम्यान घटना घडली अशी माहिती चुकीची असल्याचे संरक्षण विभागाच्या (डिफेन्स) प्रवक्त्यांनी कळविले आहे.

Web Title : Pune Metro |a shooting took place at the metro shed a metro employee injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona 3rd Wave | तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका

Solapur News | सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍याची सटकली, म्हणाले – ‘कलेक्टर साहेब, 2 एकर गांजा लावू द्या की…’

Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यात 85 लाखाच्या फसवणूक प्रकरणी कमलेश नायरविरूध्द गुन्हा