Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसादाला सलाम ! अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

आगामी काळात ही मेट्रोला प्राधान्य देण्याचे चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Metro – Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनंत चतुर्दशीसाठी केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून; गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी एक लाख ६३ हजार पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला. आगामी काळात सण उत्सवाच्या काळात ही पुणेकरांनी वाहतूककोंडीत न अडकता; मेट्रोला प्राधान्य देण्याचे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे. (Pune Metro – Chandrakant Patil)

पुणे शहराला गणेशोत्सवाची वेगळी परंपरा आहे. अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह आसपासचे नागरिक पुण्यात येत असतात. परिणामी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ अनेक भागात पुणेकरांना वाहतुककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही संभाव्य वाहतूककोंडी होऊ नये; यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करण्याचा संकल्प केला होता. तसेच, पुणेकरांनीही मेट्रोनेच प्रवास करण्याचे आवाहन केले होते (Pune Metro – Chandrakant Patil). चंद्रकातदादा पाटील हे मेट्रोने प्रवास करत असताना त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) हे देखील होते.

नामदार पाटील यांनी संकल्पाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यासाठी वनाझ ते पुणे महापालिका मेट्रोने प्रवास केला. या प्रवासावेळी नामदार पाटील यांनी अनेक मेट्रो प्रवाशांशी अनौपचारिक संवाद ही साधला. यावेळी पुणेकरांनीही मेट्रोचे भरभरून कौतुक केले होते. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या आवाहनानुसार विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरात जाणाऱ्या नागरिकांनी मेट्रोनेच प्रवास करणे पसंत केले. जवळपास एक लाख ६३ हजार पुणेकरांनी गुरुवारी मेट्रोने प्रवास केला.

पुणेकरांच्या या नव्या विक्रमाबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व पुणेकरांसह महामेट्रोचे व्यवस्थापकीय
संचालक श्रावण हर्डीकर (IAS Shravan Hardikar), जनसंपर्क अधिकारी आणि प्रशासन हेमंत सोनावणे
(Hemant Sonawane) सर्वांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत. तसेच, आगामी काळात नवरात्री,
दिवाळी यांसारखे अनेक सण होणार आहेत. त्यामुळे या काळात ही खरेदीसाठी बाहेर पडताना मेट्रोला प्राधान्य द्यावे,
असे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया