Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro- Ganeshotsav 2023 | अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पा घरी घेऊन येण्यासाठी गणेश भक्त आतूर झाले आहेत. गणेशोत्सव काळात पुण्यात होणारी गर्दी व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर यंदा पुणेकरांना आपल्या लाडक्या बाप्पाला मेट्रोमधून आणता येणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे नागरिकांना गणपतीची मूर्ती मेट्रोमधून घरी नेता येणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने ट्विट करुन नियमावली जाहीर केली आहे. (Pune Metro- Ganeshotsav 2023)

पुणे मेट्रोकडून जाहिर करण्यात आलेली नियमावली खालील प्रमाणे…

हे करा

 1. गणपतीची मूर्ती 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.
 2. मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या
 3. कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या
 4. स्थानकावरील लिफ्टचा वापर करा
 5. मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्षात घ्या आणि पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा
 6. ढोल-ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेले निर्बंधाचे पालन करा, शांतता राखा
 7. आपल्यापासून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या
 8. स्थानक, फलाट, मेट्रो ट्रे व परिसर अस्वच्छ करु नका
 9. एकमेकांना साहाय्य करा व सुरक्षित प्रवास करा
 10. जाण्या-येणाच्या मार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या (Pune Metro- Ganeshotsav 2023)

https://x.com/metrorailpune/status/1702260930556617052?s=20

हे करु नका

 1. 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेली गणेश मूर्तीस प्रतिबंध आहे
 2. लाऊड स्पीकर, माईक, मेगाफोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर टाळा
 3. अनावश्यक गर्दी करु नका
 4. गुलाल, फुले, फटके यासारख्या वस्तूंचा वापर टाळा
 5. मेट्रो ट्रेनमध्ये कोणत्याही प्रतिबंधित व ज्वलनशील वस्तूंसह प्रवास करु नका
 6. मेट्रो ट्रेनमध्ये पूजा, गाणे, आरती, जल्लोष टाळा
 7. आकर्षक दिवे, लाईट्सचा वापर टाळा
 8. मेट्रो ट्रेनमध्ये व स्थानक परिसरात कोठेही कचरा टाकू नका
 9. मेट्रो मालमत्तेचे नुकसान करु नका
 10. गणेश मूर्तीजवळ गर्दी करुन उभे राहू नका

याशिवाय काही मदत पाहिजे असल्यास मेट्रोच्या 18002705501 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक