Pune Metro | ‘लवकरच प्रत्यक्ष मेट्रोत बसायला मिळावे, वनाज ते रामवाडी जून 22 पर्यंत पूर्ण करणार’ !

अजित पवार यांच्या हस्ते वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान ट्रायल रनला हिरवा झेंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहुप्रतिक्षित मेट्रोच्या (Pune Metro) वनाज ते रामवाडी (Vanaj to Ramwadi) या मेट्रो (Pune Metro) प्रकल्पातील वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान आज ३ डब्यांच्या २ मेट्रोद्वारे ट्रायल रन घेण्यात आली. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, अल्पना वरपे, हषार्ली माथवड, श्रद्धा प्रभुणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात मेट्रोचे ६० टक्के काम पूर्ण करणारे अधिकारी, कर्मचारी आणि सहनशील पुणेकरांचे आभार मानतो. ज्या वेळी अर्थमंत्रीपद मिळाले. त्याचवेळी ठरविले की राज्यातील कुठल्याही प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही, हे ठरवून ठेवले होते. पिंपरी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज हा मार्ग देखील घ्यावा लागेल. ही मेट्रो वनाजपासून चांदणी चौक तसेच रामवाडीच्या पुढे वाघोलीपर्यंत वाढवायची आहे.

स्वारगेट ते कात्रज (Swargate to Katraj) हा मार्ग भुयारी असणार आहे. त्याचा डीपीआर तयार करायला सांगितले आहे. भुयारी मार्गाचा खर्च खूप असतो. वाढीव डीपीआरला केंद्र सरकारची मदत मिळणार नाही. त्यासाठी राज्य शासन, पिंपरी व पुणे महापालिकेला आर्थिक भार उचलावा लागेल.

स्वारगेट ते हडपसर, रामवाडी ते वाघोली,
वनाज ते चांदणी चौक असे मेट्रोचे जाळे निर्माण करावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.
नीलम गोर्‍हे यांनी सांगितले की, मुंबई, दिल्ली, नागपूरमधील मेट्रोचा चांगला अनुभव आहे.
महिलांसाठी सुरक्षित प्रवासाचे साधन आहे. हिंजवडी भागात आयटी मध्ये हजारो नागरिक जातात,
त्याठिकाणी चांगला उपयोग झाला. कोरोना काळात मेट्रोचे काम वेगात झाले.
दादा नि पालकमंत्री असताना अनेकांची मतं जाणून घेतली. एकमत घडवून आणले. त्यामुळे हे काम वेगात झाले.

मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विकासाच्या कामात राजकारण आणले नाही.
त्यामुळे मेट्रोचे काम गतीने झाले. निओ मेट्रोचे कामही याच पद्धतीने पुढे जावे,
यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधानाच्या उपस्थितीत व्हावा.

यापूर्वी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी मेट्रोच्या तांत्रिक तपासणीसाठी वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान कोणालाही न सांगता ट्रायल रन घेतली होती.
आज या मेट्रोचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रो पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title :- Pune Metro | ‘Get on the actual metro soon, Vanaj to Ramwadi will be completed by June 22’!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

Model Capris Boret | ‘पतीला ‘सेक्स’साठी कधीही देऊ नका नकार’, अमेरिकन मॉडलच्या वक्तव्यावर वाद

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार