Pune Metro | वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे महत्त्वाचे काम पूर्ण, लवकरच होणार चाचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे (Vanaz to Ramwadi Metro Line) महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेअंतर्गत संगमवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे स्टील गर्डर (Steel Girder) बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेवर (Pune Metro) लवकरच मेट्रोकडून चाचणी घेतली जाणार आहे.

मेट्रो प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय (Shivajinagar District Sessions Court) ते रामवाडी या टप्प्यातील काम महामेट्रोकडून (Mahametro) सुरु आहे. या मार्गावरील महत्त्वाचे आणि आवाहानात्मक काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील संगमवाडी रेल्वे क्रॉसिंग येथील स्टील गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती महामेट्रोकडून (Pune Metro) देण्यात आली आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोन आणि तीन जानेवारी रोजी मेट्रोला ब्लॉक देण्यात आला होता. या कालावधीत मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आव्हानात्मक काम पूर्ण केले.

मार्गिकेवर बसवण्यात आलेले स्टील गर्डर दोन भागामध्ये बसवले आहे. या स्टील गर्डरची एकूण लांबी 45 मीटर असून वजन 115 मेट्रिक टन आहे. गर्डर बसवण्यासाठी 400 मेट्रिक टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात आला. अशा प्रकारची क्रेन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही गर्डर बसवण्यात आल्याने वनाज ते रामवाडी स्थानक या मार्गिकेवरील महत्त्वाचे काम संपले असून लवकरच मेट्रोची चाचणी या मार्गावर घेतली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा सत्र न्यायालय इंटरजेंच स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाचे व्हायाडक्टचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.
येत्या काही महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल. या मार्गावरील स्थानकांचे काम देखील प्रगतिपथावर आहे.
या मार्गामुळे पुणे रेल्वे स्थानक, वाडिया महाविद्यालय चौक, बंडगार्डन, कल्याणी नगर आणि रामवाडी मेट्रोला
जोडले जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित
(Managing Director Dr. Brijesh Dixit) यांनी दिली.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा 17 किमीचा तर वनाज ते रामवाडी हा 16 किमी
लांबीचा अशा दोन मार्गिकेचे काम सध्या प्रगतिपथावर आहेत.
यातील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी या 7 किमी तर वनाज ते गरवारे महाविद्यालय या 5
किमी अशा 12 किमीच अंतराच्या टप्प्यात मेट्रोची सेवा सुरु झाली आहे.

Web Title :- Pune Metro | installation of steel girders at sangamwadi railway crossing under vanaj to ramwadi metro line completed