Pune Metro | महामेट्रोची नवी ‘डेड लाईन’ ! 33.1 किमीचा मार्ग मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणे मेट्रो प्रकल्पातील (Pune Metro) पहिल्या टप्प्यातील वनाझ (Vanaz) ते गरवारे कॉलेज (Garware College) आणि पिंपरी (Pimpri) ते फुगेवाडी (Phugewadi) हे दोन मार्ग सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) म्हणजे महामेट्रो (Mahametro) 33.1 किमी मार्ग मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 ही डेड लाईन देण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे (Corona) कामाला वेळ लागल्याने आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली.

 

महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे (PRO Hemant Sonawane) यांनी सांगितले की, पुणे मेट्रोचा (Pune Metro) 33.1 किमीचा मार्ग पूर्ण करण्याची अंदाजित अंतिम मुदत मार्च 2023 असून हा मार्ग पूर्ण करण्यासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
जर कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर थोडा उशीर होऊ शकतो.
लाईन 1 – पीसीएमसी (PCMC) ते स्वारगेट (Swargate) या 17.4 किमीच्या मार्गात पाच भूमिगत स्थानके आणि नऊ उन्नत स्थानके असणार आहेत. तसेच लाईन – 2 वनाझ ते रामवाडी (Ramwadi) या 15.7 किमीच्या मार्गात 16 उन्नत स्थानके असणार आहेत.

 

सर्व स्थानकांचे काम वेगाने सुरु
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation), डेक्कन (Deccan), संभाजी गार्डन (Sambhaji Garden) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) येथील सर्व स्थानकांचे काम वेगाने सुरु आहे.
काही स्थानकांचे काम लवकर पूर्ण होईल किंवा थोडा उशीर होऊ शकतो.
मात्र आमच्या योजनेनुसार आम्ही अंतिम मुदतीनुसार जात असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात प्रवाशांची संख्या घटली
पुणे मेट्रो लॉन्च होऊन शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले. पहिल्या महिन्यात अनेकांनी मेट्रोने प्रवास केला.
मात्र, एप्रिलमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या आठवड्यापेक्षा विकेंडला जास्त आहे.
मेट्रो स्थानकाजवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या व्यावसायिक कामासाठी सेवेचा वापर सुरु केला आहे.
आणि मेट्रोचा विस्तार झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढेल असेही सोनवणे म्हणाले.

 

Web Title :- Pune Metro | mahametros new deadline attempt to complete 33.1 km route in pune by march 2023 pune metro

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा