Pune Metro | 1 एप्रिलपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड, MMRDA, नागपूर महापालिका क्षेत्रात मेट्रो अधिभार आकारला जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | आजपासून (1 एप्रिल 2022) नवीन आर्थिक वर्षापासून पुण्याबरोबरच (Pune) पिंपरी – चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि नागपूर (Nagpur) महापालिका, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) (Mumbai MMRDA) क्षेत्रात 1 टक्का जादा अर्थात तेथील रेडीरेकनर दरापेक्षा 1 टक्का अधिक मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून संबधित महानगरात मेट्रो अधिभार आकारला जाणार आहे. अशी माहिती राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी दिली. (Pune Metro)

 

मेट्रो प्रकल्पाचे (Metro Project) काम सुरू असलेल्या राज्यातील महानगरांत दस्त खरेदी, गहाणखताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात 1 टक्का मेट्रो अधिभार न घेण्याची कोरोना महामारीत देण्यात आलेली सवलत 31 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे आता मेट्रो अधिभार लागणार आहे. (Pune Metro)

 

श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, ”कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे सन 2020 मध्ये आगामी 2 वर्षे मेट्रो अधिभार लागू न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) घेतला होता. त्यानुसार राज्यातील एमएमआरडीए, पुणे, पिंपरी – चिंचवड आणि नागपूर या शहरांना मेट्रो अधिभारातून सवलत देण्यात आली होती. परिणामी नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. ही मुदत 31 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे. हा अधिभार वाढवू नये, अशी मागणी बांधकाम क्षेत्राशी निगडित विविध संस्था, संघटनांनी केली होती. पण, राज्य सरकारने मेट्रो अधिभार लावण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.”

 

 

Web Title :- Pune Metro | metro surcharge in pune pimpri chinchwad mumbai mmrda nagpur from today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा