Pune Metro News : PCMC ते फुगेवाडी या 6 किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 45 % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट , स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. 10 जानेवारी 2020 रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या 1 किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. बरोबर एक वर्षांनी आज ही दुसरी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी आज 3 जानेवारी 2021 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः 6 किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली. कोरोना मुळे 6 ते 7 महिने कामाचा वेग बाधीत झाला होता तरीदेखील हा महत्व पूर्ण टप्पा मेट्रोने आज पारित केला.

pune-metro-1

दुपारी दीड वाजता मेट्रो ट्रेन PCMC स्थानकावरून सुटली व दुपारी 2 वा फुगेवाडी या स्थानकावर पोहोचली. आजच्या चाचणीसाठी डी. डी. मिश्रा (कार्यकारी संचालक), रवी कुमार (मुख्य प्रकल्प अभियंता), संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकार्‍यांनी अथक परिश्रम केले. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटर ने ही ट्रेन चालविली. या चाचणीसाठी ओएचई (OHE) तारा 25 के.व्ही विद्युत भाराने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रभावित केल्या होत्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच 6 किमी रेल्वे रूळ (ट्रॅक) त्याची सुरक्षेतेच्या दृष्टीने निरीक्षण अश्या अनेक बाबींची पूर्तता करून आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी 3 कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासुन झटत होते.

pune-metro-2

पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असुन चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. आज 3 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेली चाचणी हि पुणे मेट्रोच्या कामामधला एक महत्वाचा टप्पा असुन याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, की, ‘आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. सर्व पुणेकरांचे पुणे मेट्रोच्या कामात मोठे योगदान असल्यामळेच महामेट्रो हे काम यशस्वीरीत्या पुर्ण करू शकते’.

 

pune-metro-3

 

pune-metro-4

 

pune-metro-5