Pune Metro News | मेट्रो पुण्याची, कामगार बिहारचे; ‘PMRDA’च्या अजब नोकरभरतीवर मनसेचे तीव्र आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro News | पुणे मेट्रो लवकरच शहरात सेवा देणार असली तरी, मेट्रोला कुशल कामगार मात्र बिहारचे हवे असल्याची बाब समोर आली आहे. पुणे मनसे तर्फे याविरोधात औंध पीएमआरडीए Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील शिवाजीनगर ते हिंजवडी (Shivajinagar to Hinjewadi) या मार्गावर लवकरच मेट्रो सुरु होणार असून, मेट्रोसाठी आवश्‍यक कामगार भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये देत भूमिपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मेट्रो प्रशासन (Pune Metro News) व पीएमआरडीए कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी आंदोलन केले.

 

 

शहरात मेट्रो प्रकल्प (Metro Project) राबविताना शहरातील वाहतुक कोंडी फुटेल, खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतूकीला (Public Transport) प्राधान्य मिळेल व स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होतील अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात जागाभरतीची जाहिरात बिहारमध्ये (Bihar) प्रसिद्ध केल्याबद्दल मनसेने तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान मेट्रो व पीएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जागाभरतीची जाहिरात महाराष्ट्रातील (Maharashtra) वर्तमानपत्रातही देण्यात यावी अशी मनसेतर्फे मागणी करण्यात आली आहे.

 

 

आंदोलनावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar), नेते राजेंद्र वागसकर (Rajendra Wagsarkar), विभागाध्यक्ष विनायक कोतकर (Vinayak Kotkar) यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर मनसेच्यावतीने अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शहराध्यक्ष बाबर यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील तरुणांमध्ये गुणवत्ता, क्षमता असतानाही
पुणे मेट्रो प्रशासन मेट्रो भरती बिहार राज्यातुन कशाला हवी आहे? स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, असा राज्य सरकारचा (State Government)
आदेश असताना मेट्रो प्रशासन (Metro Administration) बिहारमधील पाटणा (Patna) येथे मुलाखती घेणार आहे. तेथे जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील भुमीपुत्रांच्या विरोधी भुमिकेचा मनसे तीव्र निषेध करत आहे. या भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही.
बिहारमधील नोकरभरती तातडीने थांबवावी, पुणे मेट्रो भरतीमध्ये महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा अधिकार आहे.
त्यामुळे त्यांना संधी द्या. मराठी वृत्तपत्रांमध्ये (Marathi Newspapers) त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध करा.
तसे न केल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.’ (Pune Metro News)

 

Web Title :  Pune Metro News | of Metro Pune, workers of Bihar; Intense agitation by MNS over strange recruitment of ‘PMRDA’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा