Pune Metro | लवकरच सुरु होईल पुणे मेट्रोचे भुयार; फक्त स्थानकांचे काम राहिले

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – पुण्यात मेट्रो (Pune Metro) ट्रेनचे काम सुरु असून, काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते गरवारे महाविद्यालय (Garware College) ते वनाझ (Vanaz) टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुणे मेट्रोमध्ये (Pune Metro) शिवाजीनगर (Shivajinagar) ते स्वारगेट (Swargate) हा 5 किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी (Underground Tunnel) आहे. या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच पुणेकरांना या भुयारी मार्गातून प्रवास करता येणार आहे.

 

या भुयारी मार्गावर शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट, मंडई (Pune Mandai) व कसबा पेठ (Kasba Peth) ही तीन स्थानके येतात. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता या मध्यवर्ती भागातील तीनही स्थानकांची कामे सुरू आहेत. ती नव्या अत्याधुनिक पद्धतीने केली जात आहेत. मध्यवर्ती भागात स्थानकासाठी मिळणाऱ्या जागेची अडचण लक्षात घेऊन वेगळ्या पद्धतीने स्थानकांची कामे करण्यात आली आहेत. (Pune Metro)

 

स्थानकाचा (Pune Metro Station) लहानसाच भाग जमिनीच्यावर असेल.
तिथून स्थानकात येत जात येईल. त्यासाठी साधा जीना, सरकता जीना व लिफ्ट अशा तीन सुविधा आहेत.
इथून स्थानकात गेल्यानंतर डावी आणि उजवीकडे प्रत्येकी 70 मीटर याप्रमाणे 140 मीटर रुंद प्लॅटफॉर्म असेल.
त्याच्यावर एक मजला असेल. मजल्यात कॅफेटेरीया आणि तिकीट घर असेल.

 

Web Title :- Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी