Pune Metro | अखेर मुहूर्त ठरला ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला मिळणार ‘स्पीड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेच्या ट्रॅकवर अडकलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (Hinjwadi Shivajinagar Metro) प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प मार्गी कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी आता मुहुर्त ठरला आहे. गणेश उत्सव संपल्यानंतर 21 सप्टेंबरपासून या बहुप्रतीक्षित कामास वेग लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर (Pune Metro) दरम्यान 3 ते 4 टप्प्यांत कामाची विभागणी केली जाणार असून, त्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश पीएमआरडीएने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल (Pune IT City Metro Rail) कंपनीला दिले आहेत.

‘पीएमआरडीए (PMRDA) मार्फत सार्वजनिक आणि खासगी भागीदारीमधुन हा मेट्रो प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागा पुणे आयटी सिटी मेट्रोच्या ताब्यात दिल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी टाळाटाळ होत होती. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै अखेरपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर एका बैठकी दरम्यान कोणत्याही परिस्थितीत 25 सप्टेंबरच्या आत काम सुरू करा,’ असे फर्मानच काढले. यावरुन आता अखेर मेट्रोच्या कामासाठीचा मुहूर्त ठरला आहे. 21 सप्टेंबरपासून कामाला गती येणार असल्याचे संकेत ‘PMRDA’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही भूसंपादनासह अन्य अडचणींमुळे या प्रकल्पाला अपेक्षित गती प्राप्त होत नव्हती.
भूसंपादनाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असल्याने हिंजवडीतून (Hinjwadi) प्रत्यक्ष काम सुरू करण्याची तयारी ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) केली आहे.
दरम्यान, PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल यांच्यात झालेल्या सवलत करारानुसार ‘नियुक्तीची तारीख’ ठरल्यावर त्या तारखेपासून निर्धारित मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करावा लागतो.
प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर 3 ते साडेतीन वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान पुणे आयटी सिटी मेट्रो (Pune IT City Metro Rail) कंपनीवर आहे.

दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर (Hinjwadi Shivajinagar Metro)
या दरम्यान 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो यांच्यात ‘सवलत करारनामा’ करण्यात आला होता.
या करारनाम्यानंतर 6 ते 8 महिन्यांत ‘PMRDA’ ने सर्व जागांचा ताबा आयटी सिटी मेट्रो रेलकडे देणे अपेक्षित होते.
मात्र, या सर्व प्रक्रियेला किमान दीड ते दोन वर्षांचा उशीर झाला.

Web Titel :- Pune Metro | pune hinjewadi shivaji nagar metro project work to start from 21st september

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे