Pune Metro | पुण्यातील मेट्रोचा बांधकाम क्षेत्राला फायदाच : डॉ. ब्रिजेश दीक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | मेट्रो प्रकल्पामुळे (Pune Metro) पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती भागासोबतच आजूबाजूचा भाग देखील जोडला जाणार आहे. सर्वोत्तम आणि वेळेची बचत करणारा पर्याय मेट्रोमुळे नागरिकांना निर्माण झाला असल्याने याचा सकारात्मक परिणाम बांधकाम व्यवसायावरही होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (dr. brijesh dixit) यांनी येथे दिली

क्रेडाई पुणे मेट्रोच्या (credai pune metro) वतीने आयोजित केलेल्या ३८ व्या सर्वसाधारण सभेत मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील बांधकाम व्यवसाय प्रकल्पाचा कसा फायदा होऊ शकेल, या विषयावर दीक्षित बोलत होते. ते म्हणाले, पुणे मेट्रोचे काम कोरोनाकाळातही जोमात सुरु आहे. भविष्यात शहरात मेट्रो धावताना दिसेल. यासोबतच विकासही गती घेईल. महामेट्रो भविष्याचा ही वेध घेत आहे. मेट्रोच्या तुलनेत कमी किंमत मात्र तितकीच प्रभावी अशी निओ मेट्रो (neo metro) आणण्याचा महामेट्रोच्या (Maha Metro) विचाराधीन आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला आणखी चालना मिळू शकेल. निओ मेट्रोची प्रवासी क्षमता ही ताशी १५ हजार प्रवासी इतकी असून मेट्रोच्या तुलनेत तिची किंमत ६० ते ७० कोटी रुपये प्रती किलोमीटर असल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर

वास्तुविशारद शितेश अग्रवाल (Architect Shitesh Agarwal) म्हणाले की, मेट्रोमुळे शहर बदलत चालले आहे. येणाऱ्या काळात मेट्रो प्रकल्प (Pune Metro) आणि मेट्रो स्टेशन्सच्या (Metro Station) नजीकच्या परिसरात आमूलाग्र बदल होणार आहे. मेट्रोमुळे शहराच्या कार्यपद्धतीत बदल होणार आहेत. घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही मोती बचत होणार आहे. त्यामुळे शहराची पुनर्रचना करण्यासाठी क्रेडाई सदस्यांकडून आम्ही सहभागाची व एकत्रित काम करण्याची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (Director of Mahametro Atul Gadgil), क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे (
Credai Pune Metro President Anil Farande), सचिव अरविंद जैन (Arvind Jain), उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे (ranjit naiknavare), मनीष जैन (Manish Jain), अमर मांजरेकर (Amar Manjrekar) आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Metro | Pune Metro benefits the construction sector: Dr. Brijesh Dixit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update