Pune Metro | ‘जाना था जापान पहुंच गए चीन’ ! पुणे मेट्रोच्या ‘या’ स्टेशनमुळे प्रवाशी त्रस्त, नाव बदलण्याची जोरदार मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | काही दिवसांपूवी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे शहरातील पहिल्या मेट्रो ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो (Pune Metro) ला जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. मात्र, मेट्रो मार्गावरील एका स्थानकाच्या नावामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. ’भोसरी’ असे या स्थानकाचे नाव सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे. पिंपरी ते फुगेवाडी अशी मेट्रो सेवा सुरू झाली आहे.

 

नावावरून लोकांचा गोंधळ
‘जाना था जापान पहुंच गए चीन’ हे अनेक दशके जुने गाणे तुम्ही ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार सध्या पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या बाबतीत घडत आहे. वास्तविक भोसरी मेट्रो स्थानकाच्या नावावरून येथील लोकांचा गोंधळ उडाला आहे (confused with the name of Bhosari metro station). मेट्रो ट्रेन पिंपरीच्या भोसरी स्थानकापर्यंत जाते, असे लोकांना वाटते.

 

नाशिक फाट्याजवळही भोसरी
या समजामुळे ते ट्रेनमध्ये चढतात पण नंतर त्यांना दुसर्‍याच भोसरी मेट्रो स्टेशनवर उतरावे लागते. जे मुंबई – पुणे हायवेला लागून असलेल्या नाशिक फाट्याजवळ आहे. भोसरी हे पिंपरी – चिंचवड औद्योगिक शहराचे उपनगर आहे आणि ते नाशिक फाट्यापासून किमान 5 किलोमीटर अंतरावर आहे. (Pune Metro)

नाव बदलण्याची मागणी
पुणे मेट्रोच्या या स्थानकाच्या नावामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक पिंपरीतील भोसरीला जाण्यासाठी बसतात पण दुसरे स्टेशन गाठतात. त्यामुळे आता या मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

नाव बदलण्याचा विचार सुरू
महा मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, या मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याचा विचार सुरू आहे. आशा आहे की लवकरच त्याचे नाव बदलले जाईल.

 

प्रवाशांना त्रास
पतित पावन संघटनेचे पदाधिकार्‍याच्या दिलेल्या माहितीनुसार, भोसरी स्थानकाच्या नामकरणाला आमचा तीव्र आक्षेप आहे.
या स्थानकामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्याचवेळी, भोसरी परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात त्यांच्या नातेवाईकांना मेट्रो ट्रेनमध्ये चढल्याने खूप त्रास सहन करावा लागला.
त्यांनी सांगितले की, माझे नातेवाईक जेव्हा मेट्रोमध्ये चढले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही मेट्रो भोसरीला जाते.

एका स्टेशननंतर त्यांना भोसरी स्टेशन आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर ते मेट्रोतून खाली उतरले. मात्र, उतरल्यानंतर ते अन्य ठिकाणी आल्याचे त्यांना समजले.
त्यामुळे त्यांचा पैसा, वेळ आणि उर्जा वाया गेली.

 

Web Title :- Pune Metro | pune metro bhosari station name has become a matter of confusion amongst commuters

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा