Pune Metro | पुण्यातील ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावात चूक ?; स्थानक ‘या’ नावाने ओळखले जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकाच्या (Pimpri-Chinchwad Metro Stations) नाव बदलण्यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरातील ‘बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या (Budhwar Peth Metro Station) नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले होते. दरम्यान आता ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशन’ हे नाव बदलून कसबा पेठ (Kasba Peth Metro Station) केले जाण्याची शक्यता आहे. (Pune Metro)

 

शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या बुधवार पेठेत मेट्रो स्थानक तयार होणार होते. तर, महामेट्रोच्या प्रकल्प अहवालात ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशन’ नाव देण्यात आले. परंतु, जागेअभावी बुधवार पेठेत स्टेशन तयार करणं अवघड होते. म्हणून त्या ठिकाणाहून हलवून कसबा पेठेत साततोटी पोलीस चौकीजवळ (Sattoti Police Chowki) स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. मात्र, अहवालामध्ये स्थानकाच्या नावाचा बदल केला नाही. दोन्ही पेठांत बरेच अंतर असल्याने या स्टेशनचे नाव चुकीचे असल्याचे निदर्शनास आलंय. (Pune Metro)

 

दरम्यान, याबाबत पुणे मेट्रोच्या बुधवार पेठ स्थानकांचे नाव बदलून कसबा पेठ केले जाण्याची शक्यता आहे. त्या संबंधीचा प्रस्ताव महामेट्रोने राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकारकडे (Central Government) पाठविला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या स्थानकांची नावे बदलण्याची अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या दरम्यान, वनाझ ते रामवाडी (Vanaz to Ramwadi) मार्गिकेवरील ‘आयडियल कॉलनी’ (Ideal Colony) स्थानक पौड फाटा, केळेवाडी या ठिकाणी आहे; पण, आयडियल कॉलनी या स्थानकापासून काही अंतरावर आहे.
त्यामुळे या स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार या प्रस्तावात आयडियल कॉलनीचे नाव बदलण्याचा मुद्दा देखील नमूद केला गेला आहे.
त्याचबरोबर पुणे – मुंबई महामार्गालगत (Pune – Mumbai Highway) नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ (Bhosari Station) असे नाव देण्यात आले आहे.
त्या स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास 10 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत.

 

Web Title :- Pune Metro | pune metro budhwar peth metro station to be renamed Kasba Peth Metro Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा