Pune Metro | पुणे मेट्रोतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणे मेट्रोच्या दोन मार्गिका आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट PCMC to Swargate (१७.४ किमी) आणि वनाझ ते रामवाडी Vanaz to Ramwadi (१५.७ किमी) या एकूण ३३ किमी मार्गांपैकी २५ किमी मार्ग उन्नत आहे. उर्वरित ६ किमी मार्ग भूमिगत आहे. (Pune Metro)

 

पुणे मेट्रोचा उन्नत मार्ग रस्त्याला असणाऱ्या दुभाजकाच्या जागेत बांधण्यात येत आहे. २५ किमी उन्नत मार्गापैकी १२ किमी मार्गाचे उदघाटन ६ मार्च २०२२ रोजी मा. पंतप्रधान (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरित १३ किमी उन्नत मार्गाचे काम मेट्रोतर्फे सुरु आहे. (Pune Metro)

 

पुणे मेट्रोच्या कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. तसेच या वर्षी मोठ्याप्रमाणात पडलेल्या पाऊसामुळे त्याच्या भर पडली आहे. मेट्रो वेळोवेळी रस्ते दुरुस्त करीत आली आहे. रस्त्यांवरचे खड्डे, ड्रेनेजची दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, पाइपलाइनची दुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती हि कामे मेट्रो करीत आली आहे. सध्या वनाझ ते गरवारे, PCMC ते फुगेवाडी आणि RTO ते बंडगार्डन येथील कामे संपली असल्याने तेथील बॅरिकेड हटवून रास्ता पूर्ववत करण्यात आला आहे. मेट्रोने नेहमीच कामे झाल्यावर बॅरिकेड हटवून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरु असताना देखील कर्वे रस्त्यावर विषे वाहतूक कोंडी झाली नाही.

ज्या ठिकाणी मेट्रोची कामे झाली आहेत तेथे रस्ता पूर्ववत करण्यासाठी मेट्रोने कामे सुरु केली आहेत. बोपोडी येथे एल्फिस्टन रस्ता ते MSEB चौक आणि एल्फिस्टन रस्ता ते रेल्वे क्रॉसिंग येथील रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यात आला आहे. तसेच खडकी येथील खडकी पोलीस स्टेशन ते रेल्वे अंडरपास आणि रेल्वे अंडरपास ते साई मंदिर चौक येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. RTO ते रामवाडी या भागामध्ये कल्याणी नगर, बंडगार्डन, पुणे स्टेशन येथे देखील डांबरीकरण करण्याची कामे करण्यात आली आहे. PCMC ते फुगेवाडी या मार्गिकेमध्ये आहिल्याबाई होळकर चौक, नाशिक फाटा आणि फुगेवाडी येथे डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. डांबरीकरण करताना मॅनहोलची दुरुस्ती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जसे जसे मेट्रोचे काम संपेल तसे बॅरिकेड हटवून रस्ता पूर्ववत करण्यात येईल व रस्त्याची कामे हाती घेण्यात येतील.

 

संबधीत प्रकल्पाच्या अभियंत्यांना मेट्रोचे काम संपलेल्या ठिकाणी बॅरिकेड हटवणे किंवा बॅरिकेडमधील रुंदी कमी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

 

मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम चालू असताना रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेड सुरक्षिततेच्या दृष्ट्टीने लावावे लागतात. अश्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी मेट्रोने २०१७ सालापासून ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. हे ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक पोलिसांना मदत करून वाहतुकीचे नियोजन करतात. आजमितीस मेट्रोने २७२ ट्रॅफिक वॉर्डन शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तैनात ठेवले आहेत. सध्या हे ट्रॅफिक वॉर्डन फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट, गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि RTO ते रामवाडी येथे वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे काम करीत आहेत. या व्यतिरिक्त मेट्रोने या मार्गांवर जलद कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम) तैनात केली आहे. जलद कृती दल या मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या रस्त्यांवर कोणतीही दुर्घटना झाल्यास त्वरित मदतीसाठी पोहचते. तसेच या भागांत वाहतूक वाढल्यास वाढीव कुमक म्हणून वाहतूक पोलिसांना मदत करत आहे.

नुकतेच मेट्रोने फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या उन्नत मार्गावरील व्हायडकतचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील लोखंडी बॅरिकेड काढण्यात आले आहेत. मेट्रोने वेळोवेळी जेथे जेथे उन्नत मार्गाचे काम किंवा स्थानकाचे काम संपले आहे तेथे तेथे बॅरिकेड काढून रास्ता पूर्ववत करून वाहतूकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होत आहे.

 

याव्यतिरिक्त मेट्रोने रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत –

१. मेट्रो मार्गातल्या रस्त्यांची डागडुजी, तसेच पादचारी मार्ग, ड्रेनेजची झाकणे इत्यादींची नियमित दुरुस्ती, खड्डे बुजवणे, दुभाजकांची कामे यामुळे वाहतूक नियोजनात मदत होत आहे.

 

२. मेट्रो काम करत असलेल्या रस्त्यांवर बॅरिकेड लावून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला.
त्याव्यतिरिक्त वाहतूक सूचना, मार्गावरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीचे दिवे, सोलर विजेवर चालणारा वाहतूक सूचना फलक इत्यादी कामे करण्यात आली आहेत.

 

३. सध्या मेट्रो बंडगार्डन रस्ता, खडकी, कल्याणी नगर, इत्यादी ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम करत आहे.
या मार्गिकांमधील पादचारी मार्गदेखील पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

 

४. मेट्रोने कामासाठी जेंव्हा जेंव्हा रस्ता वळविला आहे, तेंव्हा स्थानिक वाहतूक पोलीसांशी सल्ला-मसलत करून रीतसर परवानगी घेऊन हि सर्व कामे केली आहेत.
तसेच रस्ता वळविताना पूर्व सूचना वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्थानिक लोकांपर्यंत पोहचविली आहे.
रस्ता वाळविण्या आधी दुरुस्त केला आहे. त्यामुळे वाळविलेल्या मार्गावर वाहतूक नियोजनात मदत होणार आहे.

५. मेट्रोचे काम चालू असलेल्या रस्त्यांवर सहयोग केंद्र व माहिती केंद्र उभारण्यात आले आहेत.
यांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या मेट्रो प्रशासनाकडे पोहोचविण्यास मदत होत आहे.
मेट्रोच्या टोल फ्री क्रमांकाची माहिती शहरभर मेट्रोच्या सर्व बॅरिकेडवरील पोस्टरवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमांमध्ये येणाऱ्या वाहतूक विषयी सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

 

६. मेट्रो संवाद या माध्यमातून स्थानिक गृहनिर्माण सोसायटींद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न मेट्रो करीत आहे.
लोकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

 

मेट्रोचे काम चालू असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोने विविध उपाययोजना केल्या आहेत.
महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या सूचनेद्वारे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सध्याच्या उपाययोजनांचा फेर आढावा घेऊन
त्या अधिक सक्षमपणे राबविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Pune Metro | Pune Metro started large-scale road repair works

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radhakrishna Vikhe Patil | ‘भारत जोडो’ यात्रा नसून जत्रा आहे – राधाकृष्ण विखे पाटील

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)