Pune Metro | पुणेकरांवर 1 एप्रिलपासून मेट्रो अधिभारचा भुर्दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणे शहरात अजुनही मेट्रो प्रोजेक्टचे (Pune Metro) काम पुर्ण क्षमतेने सुरु झाले नसतानाही आगामी 1 एप्रिलपासून पुणेकरांना 1 टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचं स्पष्टं झालं आहे. पुणे शहर (Pune City) आणि पिंपरी-चिंचवडसाठी (Pimpri-Chinchwad) 1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना 1 टक्का मेट्रो कर (Metro tax) द्यावा लागणार आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश काल (गुरुवारी) नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडून (Registration Stamp Duty Department) काढण्यात आला आहे.

 

चार वर्षाआधीच पुणे शहरात मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाची अंमलबजावणी होत असलेल्या राज्य सरकारने (Maharashtra Government) स्टॅम्प ड्युटीवर 1 टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि नागपूरमध्ये (Nagpur) अंमलबजावणीस सुरुवात झाली. पण, 2020 साली शासनाने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती.

 

दरम्यान, हा कालावधी समाप्त होत असल्याने पुणे शहरात 1 एप्रिलपासून 1 टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 1 एप्रिलपासून नवीन आणि वाढीव रेडीरेकनर दरही लागू होणार असल्याने घराच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान, पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
तसेच सरकारने स्टॅम्प ड्युटीवर गेल्यावर्षी सुट दिली होती.
त्याचबरोबर जवळपास आणखी एक वर्ष तरी मेट्रो अधिभार वसुलीस स्थगिती द्यावी,
अशी आग्रही मागणी पुणेकर, बांधकाम व्यावसायिक व विविध संघटनांकडून केली जात आहे.

 

 

Web Title :- Pune Metro | pune metro tax levied on pune residents from 1 april 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी; तुमच्याकडे आहे ‘हा’ शेअर?

 

Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एमईएस इलेव्हन संघांचा पहिला विजय