Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती (Pune Metro) समोर आली आहे. मार्च महिन्यामध्ये वनाज ते गरवारे महाविद्यालय (Vanaz to Garware College) आणि पिंपरी ते फुगेवाडी (Pimpri to Phugewadi) ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बाकी मार्गाचे काम महामेट्रो करत आहे. आता हडपसर (Hadapsar), पुलगेट (Pulgate) भागातही मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे, लवकरच या भागातही मेट्रो धावणार असल्याची माहिती महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे (Hemant Sonawane) यांनी दिली.

 

महामेट्रो आणि ‘पीएमआरडीए’कडून (PMRDA) 43 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते रेसकोर्स आणि हडपसर ते सासवड या मार्गाचा यात समावेश केले आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोचे काम सध्या सुरू असून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम पीएमआरडीए तर्फे सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णयही पीएमआरडीएकडून घेण्यात आला आहे. तसेच, खडकवासला ते खराडी या मार्गावर देखील मेट्रो सुरू होणार आहे. शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असल्याचे विस्तारित मेट्रोमध्ये नियोजन केले आहे. (Pune Metro)

दरम्यान, “आमचा आराखडा बनून तयार आहे. फक्त या मेट्रोचे काम पीपीपी (सार्वजनिक आणि खासगी भागीदारी) तत्त्वावर करायचे की महामेट्रो हे अद्याप ठरलेले नाही. लवकरच यावर निर्णय होईल.” असं हेमंत सोनवणे यांनी सांगितलं.

 

Web Title :- Pune Metro | pune metro to run in hadapsar pulgate area pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा