Pune Metro : तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी ! पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली तर अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणांना पुणे मेट्रोमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सुरु असलेल्या कार्यासाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अनुभवी आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, अकाउंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे.

पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक (Dy. General Manager-Finance E3)
एकूण पदांची संख्या -2
वयोमर्यादा – 45 वर्षे

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer-Signal and Telecom S1)
पदांची एकूण संख्या – 2
वयोमर्यादा – 32 वर्षे

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer – Mechanical S1)
एकूण पदांची संख्या – 2
वयोमर्यादा – 32 वर्षे

पदाचे नाव – अकाऊंट असिस्टंट (Account Assistance – Fin – NS4)
एकूण पदांची संख्या- 5
वयोमर्यादा – 32 वर्षे

अर्ज कसा करायचा ?

ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख 15 मे 2021 आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक कागपत्र जोडून आपला अर्ज करावा. अपात्र आणि अपूर्ण अर्जांचा भरती प्रक्रियेत विचार केला जाणार नाही, याची इच्छूक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिक महितीसाठी महामेट्रोच्या www. mahametro.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. अर्जाचा नमुना www.mahametro.org या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

अशी असेल निवड प्रक्रिया

अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळवण्यात येईल. यानंतर या उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर रहावे. उमेदवाराला मुलाखतीची वेळ आणि तारीख देण्यात येईल. उमेदवारांनी सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह उमेदवार यांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.