Pune Metro। पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार; सप्टेंबरपर्यंत मेट्रोची कामे गतीने वाढवण्याचा प्रयत्न, महामेट्रोची माहिती

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Metro । पुण्यातील कोथरुड येथून (8 जुलै) गुरुवारी रात्री वनाझ कॉर्नर (Vanaz Corner) (मेट्रो डेपो) ते आनंदनगर (Anandnagar) या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी करण्यात आली. (Pune metro trial run) मेट्रो लवकरच सुरु होण्यासाठी प्रशासनाकडून मेट्रोच्या कामाची गती अधिक वाढवली आहे. 2 महिन्यात वनाज ते गरवारे महाविद्यालया दरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो (Pune Metro) उपलब्ध व्हावी यासाठी महामेट्रोनं (Mahametro) तेथील काम आधी वेगात व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. म्हणून या वेगवान कामानंतर पुणेकरांसाठी लवकरच प्रवास करता येणार आहे. यामुळे अनेक लोक प्रतीक्षेत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सध्या मेट्रो ट्रॅकचं काम पूर्ण झालं आहे. म्हणून आगामी काळात 3 स्थानकांची रखडलेली कामं पूर्ण केलं जाणार आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास नाज-रामवाडी मार्गावर महामेट्रोने वनाज ते यडियल कॉलनी दरम्यान 3 किलोमीटर अंतरावर मेट्रोची तांत्रिक चाचणी घेतली. या चाचणी व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाला आहे झाले.
तर, ही चाचणी अधिकृत नव्हती. परंतु, अधिकाऱ्यांनी ट्रायलच्या पूर्वीचा 1 टप्पा म्हणून ही चाचणी घेतल्याचं कळते आहे.
या चाचणीमध्ये ट्रॅक, ओव्हरहेड केबल, सिग्नल, व्हाया डक्ट आदींची तपासणी करण्यात आली.

ट्रॅकवरून 1 मेट्रो धावत असताना या पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठीच मेट्रोचा वेग अगदी ताशी 20 किलोमीटरपेक्षा कमी ठेवण्यात आलाय.
साधारण जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ मेट्रो मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.
या पाहणीच्या वेळी 5 विभागांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलीय.
या दरम्यान, महामेट्रोनं एप्रिल महिन्याच्या अखेरीस वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची टेस्ट घेण्यासाठी प्रत्येकी 3 डब्यांच्या 2 रेल्वेगाड्या नागपूरहून पुण्यात आणल्या.
रेल्वेगाड्यांचे डबे वनाज इथल्या मेट्रोच्या यार्डातचं उतरवण्यात आले.
त्यांची जुळणी ट्रॅकवर करण्यात आली. आहे तर यानंतर ट्रायलसाठी गुरुवार हा दिवस घेण्यात आला.

या दरम्यान, सध्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, SNDT आणि गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू आहे.
आता पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी वनाज, Ideal Colony आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोनं देखरेख केली आहे.
तसेच केलं आहे. 60-70 स्थानकांची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे.
फरशी बसवणं, सरकते जिने उभारणे, लिफ्ट बसविणे, अंतर्गत सजावट आणि फर्निचर, प्लॅटफॉर्म उभारणे ही कामे सुरू असून आगामी 2 महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर महिन्यात ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आले आहे.

Web Title : pune metro starts upcoming in two months station work is 70 percent complete

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SpiceJet ची मोठी घोषणा ! आजपासून 42 शहरांसाठी मिळेल थेट विमानसेवा, जाणून घ्या मार्गासह इतर माहिती

Mumbai Crime News | धक्कादायक ! तृतीयपंथीयाने चिमुरडीला जिवंत पुरले; कुटुंबीयांनी पैसे न दिल्याच्या रागात अपहरण करून केली हत्या

cyber fraud | चीनमध्ये बसलेले ठग भारतीयांना लावत आहेत ऑनलाइन चूना, दारू-मसाल्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांना फसवले