Pune Metro Station | मेट्रो स्टेशनच्या कामामुळे डेक्कन जिमखाना बस स्टॉप येथून भिडे पूलावर येणार्‍या वाहनांसाठी उद्यापासून रस्ता बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro Station | महामेट्रोच्या (Maha Metro) डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन (Deccan Gymkhana Metro Station) आणि स्टेशनला जोडणार्‍या उन्नत पादचारी मार्गाचे काम सुरू करण्यात आल्याने डेक्कन पीएमटी बसस्टॉप (Deccan PMPML Bus Stop) येथून भिडे पुलाकडे (Baba Bhide Pull) जाणारी वाहतूक उद्यापासून १४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कन येथून भिडे पूल मार्गे नारायण पेठेत (Narayan Peth, Pune) येणार्‍या वाहनचालकांनी लकडीपुलावरून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्यावतीने (Traffic Police) करण्यात आले आहे. (Pune Metro Station)

 

मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गीकेवर (Vanaz Corner To Ramwadi Pune Metro Route) डेक्कन जिमखाना येथे स्टेशन उभारण्यात येत आहे. या स्टेशनवर जाण्यासाठी डेक्कन येथील पीएमटी बसस्टॉपजवळ इलिव्हेटेड पादचारी मार्ग तसेच या तेथे जाण्यासाठीच्या जोड रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. यामुळे जंगली महाराज रस्ता (JM Road Pune) अथवा आपटे रस्त्याने (Apte Road) आल्यानंतर डेक्कन बसस्टॉप शेजारील रस्त्याने भिडे पुलावरून मध्यवर्ती शहरात येणारा वाहन मार्ग बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावर चार चाकी वाहनांना बंदी असली तरी दुचाकी आणि रिक्षा चालकांसोबतच चार चाकी वाहने या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. (Pune Metro Station )

हा मार्ग बंद करण्यात येणार असल्याने वाहन चालकांनी खंडोजी बाबा चौकातून (Khandoji Baba Chowk Pune) डावीकडे
लकडी पुलावरून टिळक चौकात (Tilak Chowk) आल्यानंतर केळकर रस्त्याने (Kelkar Road) मध्यवर्ती शहरात जावे.
दुचाकी चालक काकासाहेब गाडगीळ पुल (Kakasaheb Gadgil Pull) अर्थात झेड ब्रिजचा (Z Bridge Pune) वापर करू शकतील.
तसेच नारायण पेठेतून भिडे पूलावरून येणार्‍या वाहन चालकांनी पूल संपल्यानंतर उजवीकडे
सुकांता हॉटेल समोरील रस्त्याने जंगली महाराज रस्त्याकडे वळावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) केले आहे.

 

Web Title :- Pune Metro Station | Road closure for vehicles coming from Deccan Gymkhana bus stop to Bhide bridge from tomorrow due to metro station work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख