Pune Metro | ‘तरीही तुम्ही आलाच’; उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींबाबत असे का म्हणाले वाचा सविस्तर

पुणे : Pune Metro | सध्याच्या लॉकडाऊन (Lockdown) काळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकांना नेहमीच काळजी घ्या, गर्दी करु नका, नाही तर कारवाई करुन असे सांगत असतानाच त्यांच्याच कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असल्याचे अनेकदा घडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने पुणे पोलिसांना आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली (Pune Metro) होती.

अजित पवार यांच्या मनातून हे जात नसल्याचे आजच्या मेट्रोच्या ट्रायल रनच्या कार्यक्रमात जाणवले. मागच्या या घटनांचा उल्लेख करुन अजित पवार म्हणाले, यापूर्वीच्या कार्यक्रमात आमच्यावर नाही तर आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना काळात गर्दी होऊ नये, म्हणून सकाळी कार्यक्रम घेतला. इतर पुणेकरांना त्रास होऊ नये, कार्यक्रम आटोपशीर व्हावा, हा या मागील उद्देश होता. मेट्रोचे दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, याची काळजी घेतली. तरीही तुम्ही आलात, असा टोला त्यांनी माध्यमांना लगावला.

हे देखील वाचा

Model Capris Boret | ‘पतीला ‘सेक्स’साठी कधीही देऊ नका नकार’, अमेरिकन मॉडलच्या वक्तव्यावर वाद

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Metro | ‘Still you came’; Read why Deputy Chief Minister Ajit Pawar said this about media representatives

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update