Pune Metro Traffic | मेट्रोच्या कामासाठी संभाजी पुल (लकडी पुल) 20 दिवस दररोज रात्री 7 तास राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Metro Traffic | वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान (vanaz to district court) मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या 24 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान वाहतूकीसाठी बंद (Pune Metro Traffic) करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी केले आहे.

टिळक चौकातून (Tilak Chowk) खंडोजीबाबा चौकाकडे (Khandojibaba Chowk) जाण्याकरीता पर्यायी मार्ग –

टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंर्धव पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक. तसेच केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओमकारेश्वर मंदिरमार्गेही वाहनचालक जाऊ शकतात.

खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग

खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस एम जोशी पुल,
गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.

यशवंतराव चव्हाण पुल व गाडगीळ पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करुन शकतात.

 

Web Title : Pune Metro Traffic | Sambhaji Bridge (lakdi bridge) for Metro work will be closed for 7 hours every night for 20 days, find out alternative routes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrasekhar Bavankule | ’14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?’

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Pune | पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या