Pune Metro | उद्या पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | लॉकडाऊनंतर पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कामाला वेग आला असून वनाज ते आयडियल कॉलनी (Vanaj to Ideal Colony) या मार्गावरील ट्रायल रन उद्या (शुक्रवारी) होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. महामेट्रो प्रकल्पांतर्गत पुण्यात मेट्रोचे काम सरु आहे. वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो मार्गाची चाचणी (ट्रयल रन) Trial run शुक्रवारी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो मार्गाची चाचणी उद्या राजकीय नेत्यांच्या उपस्थित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राजकीय नेते व्यस्त असल्याने उद्याच्या ट्रायल रनला ते उपस्थित राहतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उद्याचा ट्रायल रन होणार की नाही हे याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पाठोपाठ वनाज ते गरवारे महाविद्याल दरम्यान 3.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. महामेट्रोने वनाज ते गरवारे या 5 किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वास आणले आहे. या मार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.
पुण्यातील दोन्ही मार्गावरील मेट्रोचे हे डबे इटलीतील कारखान्यातून आणण्यात येणार आहेत.
हे विशेष प्रकारच्या हलक्या आणि कडक अशा धातूपासून बनवले आहेत.

Web Title :  Pune Metro | Trial run of Pune Metro from Vanaj to Ideal Colony tomorrow?

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण