Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | वनाज ते गरवारे महाविद्यालय (Vanaz Corner to Garware College metro route) व पिंपरी- चिंचवड महापालिका ते फुगेवाडी (pcmc to phugewadi metro route) या दोन मेट्रो (Pune Metro) मार्गांचे काम आता 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार असल्याचं महामेट्रोच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकर (Pune) व पिंपरी-चिंचवडकरांसाठी (Pimpri-Chinchwad) ही एक खुशखबर असणार आहे.

 

महामेट्रोच्या (Pune Metro) वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उद्घाटनाची वेळ जाहीर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तारखेवर उद्घाटनाची वेळ ठरवली जाणार आहे. दरम्यान, या दोन्ही मेट्रोचे किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर दोन्ही मार्ग उद्घाटनासाठी सज्ज असतील, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) मंगळवारी एका मिडीया हाऊसशी ऑनलाइन संवाद साधताना सांगितलं आहे. यावेळी प्रकल्प संचालक अतूल गाडगीळ (Atul Gadgil) हे प्रत्यक्ष तर जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे (Hemant Sonawane) हे ऑनलाईन सहभागी होते.

 

डॉ. ब्रिजेश दीक्षितम्हणाले, ‘फक्त तिकिटांमधून मिळणारे ऊत्पन्न कमी असेल हे लक्षात घेऊन महामेट्रोने आधीपासूनच ऊत्पन्नाचे मार्ग शोधले आहेत.
वनाज, स्वारगेट (Swargate) या ठिकाणी मोठी व्यापारी संंकूले बांधण्यात येत आहेत.
राज्य सरकारने टीओडी (Transit Oriented Development) कायदा करून महामेट्रोला मुद्रांक शुल्कातील (Stamp Duty) काही वाटा मिळेल अशी तरतुद केली आहे.
याशिवाय स्थानकांचे ब्ँडिंग, त्यावरील जाहिराती यातूनही मेट्रोला चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.

दरम्यान, मेट्रोचा तिकिट दर किमान 10 रूपये व कमाल 50 रूपये असेल.
प्रवाशांना मेट्रोपर्यंत येणे सुलभ व्हावे यासाठी स्थानकांच्या खालील रिकाम्या जागेत बस बे तसेच रिक्षा थांबे असणार आहेत.
स्थानकात जाण्या येण्यासाठी दोन्ही बाजूस जिने, सरकते जिने व लिफ्ट अशा 3 सुविधा सुरू झाल्या आहेत.
पहिल्या मजल्यावर तिकीट घर तसेच स्टॉल्स असतील. दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफार्म. त्याची लांबी 140 मीटर, रूंदी 21 मीटर आहे.
सौर ऊर्जेवर त्याचे कामकाज चालणाऱ्या संपूर्ण स्थानक वातानुकूलीत असणार आहे.

 

Web Title :- Pune Metro | Two metros ‘Vanaj corner to Garware College’ and ‘Pimpri-Chinchwad Municipal Corporation to Phugewadi’ will run at the end of January

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

ONGC CMD Alka Mittal | अलका मित्तल यांच्या हाती ONGC ची कमान ! एकेकाळी ‘ट्रेनी’ म्हणून ज्वाईन केली होती सर्वात मोठी ऊर्जा कंपनी, आता बनल्या CMD