Pune MHADA | म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास अखेर मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- म्हाडा पुणे विभागाच्या (Pune MHADA) सुमारे सहा हजार सदनिकांच्या सोडतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अर्जदारांना अडचण येत असल्याने २० ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवली आहे. ९ नोव्हेंबर रोजी सोडतीचा लकी ड्रॉ काढला जाईल. (Pune MHADA)

पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांच्या सोडतीसाठी म्हाडाने ६ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार, यापूर्वी अर्ज करण्याची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत, अनामत रक्कम भरण्याची मुदत २८ सप्टेंबरपर्यंत आणि ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत होती. (Pune MHADA)

परंतु, म्हाडाने अर्जासोबतच रहिवासाचा दाखला बंधनकारक केल्याने अर्जदारांची तारांबळ उडाली होती. सप्टेंबरमधील सुट्यांमुळे रहिवासाचा दाखला मिळवणे शक्य होत नव्हते. या कारणामुळे ही मुदत वाढवण्याची मागणी विविध संस्था आणि नागरिकांनी म्हाडाकडे केली होती. अर्जदारांची ही अडचण लक्षात घेऊन आता म्हाडाने आता २० ऑक्टोबर मुदत वाढवली आहे.

नवीन तारखा पुढील प्रमाणे :

  • अज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबरपर्यंत
  • अनामत रक्कम भरण्याची मुदत – २१ ऑक्टोबरपर्यंत
  • सोडतीसाठी स्वीकृती अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार – २७ ऑक्टोबरला
  • अंतिम यादी प्रसिद्ध होणार – ३ नोव्हेंबरला
  • सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील – ९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता

सध्या या सोडतीसाठी २७ सप्टेंबर सायंकाळपर्यंत ३२ हजार ९९६ जणांनी अर्ज केले होते. तर १८ हजार ३६९ जणांनी अनामत रक्कम भरली होती.

पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी याबाबत म्हटले की, सोडतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
मागील तीन दिवसांमध्ये अर्जदारांची संख्या खुप वाढली आहे. मात्र, कागदपत्रे प्राप्त करण्याच्या अडचणींमुळे मुदत
वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच आता ही मुदत २० ऑक्टोबर केली आहे. अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची घोषणा