Pune Mhada Lottery | घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mhada Lottery | दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्यावतीने (Pune Mhada Lottery) तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुख्यत: म्हणजे या घरांमध्ये जवळजवळ दीड हजार घरे 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने (Nitin Mane) यांनी दिली. यामुळे पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे.

म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी जाहीर केली होती. यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. अशातच आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी 3 हजार पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढत आहे.

मागील दिड वर्षापासून कोरोनाने लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे.
दरम्यान, मागील दीड वर्षांत 8 हजार घरांची सोडत काढली होती.
तर, अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची ‘हॅटट्रिक’ करत पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने (Nitin Mane) यांनी आणखी एक विक्रम केला आहे.
गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे.
कोरोनापूर्वी जानेवारी 2020 साली म्हाडाच्या वतीनं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थात 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते ही घरांची लॉटरी काढण्यात आली होती.
तर, लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.

हे देखील वाचा

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Mhada Lottery | pune housing and area development board lottery of pune mhada for more than 3000 houses on the occasion of diwali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update